Ad will apear here
Next
‘एक्साइड लाइफ’तर्फे ‘डिजिटल हॅबिट्स’ सर्व्हे
बेंगळुरू : एक्साइड लाइफ इन्शुरन्सने जाहीर केलेल्या २०१८  डिजिटल हॅबिट्स सर्व्हेमध्ये भारतातील केवळ ३२ टक्के डिजिटल सॅव्ही ग्राहकांना कोणत्याही मूल्याचे ऑनलाइन व्यवहार करणे सोयीस्कर वाटते, तर ७५ टक्के जणांना डिजिटल पेमेंट करणे योग्य वाटते, हे निष्कर्ष समोर आले आहेत. डिजिटायझेशनच्या युगातील भारतीयांच्या वित्तीय डिजिटल सवयीही त्यामध्ये नमूद केल्या आहेत. हे डिजिटल सर्वेक्षण एक्साइड लाइफ इन्शुरन्सने २०१८मधील पहिल्या तिमाहीत नऊ हजारांहून अधिक आयुर्विमाधारकांच्या मदतीने केले.

डिसेंबर २०१७पर्यंत, भारतात ४८१ दशलक्ष इंटरनेट युजर होते. डिजिटल बाबतीत झालेली प्रगती, स्मार्टफोनचा वाढता वापर व वेगवान इंटरनेटची उपलब्धता यामुळे ग्राहक विविध उत्पादने व सेवा ज्या प्रकारे हाताळतात, त्यामध्ये बदल झाला आहे. ऑनलाइन भारतीय ग्राहकांना अतिशय सोयीस्कर असलेल्या व जीवन सुलभ करणाऱ्या नव्या उत्पादनांचा व सेवांचा अनुभव घेण्याची इच्छा असते.

२०१८ डिजिटल हॅबिट्स सर्व्हेनुसार, डिजिटल बाबतीत आघाडीच्या तीन गोष्टींमध्ये ई-मेल, बातम्या व सोशल मीडिया रँकिंग पाहण्यासाठी इंटरनेटचा वापर करणे यांचा समावेश असल्याचे नऊ हजारांपैकी ८८ टक्क्यांहून अधिक सहभागींनी सांगितले. डिजिटल बाबतीतील अन्य लोकप्रिय गोष्टी आहेत, प्रवासाची तिकिटे बुक करणे, सिनेमा व व्हिडिओ पाहणे, ऑफिसच्या कामासाठी संशोधन करणे व नव्या गोष्टी खरेदी करण्यासाठी संशोधन करणे.  

स्मार्टफोन व इंटरनेट यांची उपलब्धता वाढली असल्याने भारतात डिजिटल व्यवहारांमध्ये अलीकडच्या काळात मोठी वाढ झाली आहे. सर्वेक्षणाच्या मते, इंटरनेट वापरण्यासाठी अंदाजे ७२ टक्के जण फोर-जी नेटवर्कचा वापर करतात. अंदाजे ३० टक्के जण घरी-कार्यालयात वेगवान ब्रॉडबँड कनेक्शन वापरतात आणि ८२ टक्के जण अँड्रॉइड फोन वापरतात. इंटरनेट वापरण्यासाठी मोबाइल फोन अतिशय लोकप्रिय ठरत आहेत.

ई-कॉमर्समधील तेजीमुळे अधिकाधिक व्यक्ती या लाटेवर स्वार होत आहेत व डिजिटल पेमेंट करण्यास उद्युक्त होत आहेत. अनेक व्यक्ती ऑनलाइन खरेदी करत असल्याने डिजिटल पेमेंट लोकप्रिय झाली आहेत. सर्वेक्षणातील सहभागींपैकी ७५ टक्के जणांना ऑनलाइन व्यवहार करणे सोयीचे वाटते, तर बहुसंख्य युजरना कमी मूल्याचे व्यवहार करणे योग्य वाटते. क्रेडिट कार्ड हा डिजिटल पेमेंटचा पसंतीचा पर्याय असून, अधिक मूल्याचे व्यवहार करणाऱ्यांमध्ये तो अधिक लोकप्रिय आहे, तर डेबिट कार्ड हा दुसऱ्या क्रमांकाचा पसंतीचा पर्याय आहे. नोटाबंदीनंतर ई-वॉलेट झपाट्याने लोकप्रिय झाली असली तरी, ऑनलाइन व्यवहार करण्यासाठी पाच टक्क्यांहून कमी युजर ई-वॉलेट व भिम यांचा वापर करत असल्याचे सर्वेक्षणात आढळले आहे; तसेच, गेल्या ३० दिवसांत त्यांनी केलेल्या तीन मुख्य आर्थिक व्यवहारांमध्य युटिलिटी बिले भरणे, बँकिंग व्यवहार व विम्याचा प्रीमिअम भरणे यांचा समावेश होता. गेल्या ३० दिवसांत आठ टक्के युजरनी विमा योजना ऑनलाइन खरेदी केली.

सर्वेक्षणातील ६० टक्के सहभागींना आकर्षक डील ऑनलाइन खरेदी करण्यासाठी आकृष्ट करतात, तर डिजिटल मीडिया व ई-मेल प्रमोशन यामुळे २५ एकके ऑनलाइन खरेदीला उत्तेजन मिळते. डिजिटल हा माहिती मिळण्यासाठी मुख्य स्रोत असल्याचे व विमा खरेदी करण्यासाठी प्रभावशाली घटक असल्याचे ३१ टक्के जणांना वाटते. डिजिटल माध्यमाचा अवलंब करण्याचे प्रमाण वाढत असल्याने ग्राहक त्यांच्या सर्व्हिस प्रोव्हायडरशी संवाद साधण्याच्या पद्धतीत झपाट्याने बदल करत आहेत. बहुसंख्य सहभागींना ई-मेलद्वारे उत्पादने व सेवांविषयी माहिती मिळवणे सोयीचे वाटते, तर तब्बल ७२ टक्के जणांना बिले व स्टेटमेंट त्यांच्या ईमेलवर पाठवली जाणे सोयीचे वाटते. १५ टक्क्यांहूनही कमी जणांना भौतिक स्वरूपातील पद्धत सोयीची वाटते.

एक्साइड लाइफ इन्शुरन्सच्या मार्केटिंग व डायरेक्ट चॅनलचे संचालक मोहित गोयल यांनी सांगितले, ‘डिजिटल हे संशोधनापुरते माध्यम उरलेले नाही. आज अधिकाधिक ग्राहक त्यांच्या सोयीनुसार घरी बसून उत्पादन व सेवांची खरेदी करतात. ड्युरेबल्स, फॅशन, ट्रॅव्हल व मनोरंजन यांबरोबरच, वित्तीय सेवा क्षेत्रातील ई-कॉमर्समध्ये मोठ्या प्रमाणात वाढ होत आहे. डिजिटल युगामध्ये ग्राहक कशा प्रकारे वागत आहेत व विशेषतः ऑनलाइन विम्याच्या बाबतीत त्यांच्या सवयी काय आहेत, हे समजून घेण्याच्या हेतूने आम्ही २०१८ डिजिटल हॅबिट्स सर्वेक्षण केले व त्यातून महत्त्वाची माहिती मिळाली. आमच्या सध्याच्या व संभाव्य ग्राहकांशी संवाद साधण्याची आमची एकंदर डिजिटल पद्धत योग्य असल्याचे या सर्वेक्षणाच्या निष्कर्षातून अधोरेखित झाले आहे.’

इंटरनेटचा वापर, डिजिटल पसंती व ऑनलाइन व्यवहाराच्या सवयी या आधारे सर्वेक्षणातील सहभागींचे विभाजन डिजिटल सुपरहिरो, डिजिटल हिरो, डिजिटल अमॅच्युअर्स व डिजिटल ट्रॅडिशनलिस्ट असे करण्यात आले आहे. सुपरहिरो व हिरो यांच्यातील फरक स्पष्ट करण्यासाठी ऑनलाइन व्यवहारांची वारंवारिता महत्त्वाची आहे. डिजिटल सुपरहिरोंसाठी बिले भरणे व विम्याचे हप्ते भरणे हे सोशल मीडिया वापरणे, या लोकप्रिय डिजिटल बाबीपेक्षा सरस ठरले. २१ टक्के सुपरहिरोंनी विमा योजना ऑनलाइन खरेदी केल्याचे सांगितले, यातून ही बाब अधोरेखित होते. युटिलिटी बिले भरण्यासाठी डिजिटल माध्यमाचा वापर करण्यात वाढ झाल्याने, सुलभपणे पेमेंट करण्यासाठी क्यूआर कोड्स प्रिंट करण्यासाठी सरकारला उत्तेजन मिळाले आहे.

दुसरीकडे, डिजिटल सुपरहिरोंप्रमाणे असले, तरी डिजिटल हिरोंना पाच हजार रुपये किंवा त्यावरील रकमेचे व्यवहार ऑनलाइन करणे सोयीचे वाटते. इतरांशी तुलना करता, डिजिटल हिरोंच्या तुलनेत डिजिटल अमॅच्युअर्स इंटरनेटचा वापर कमी वारंवारितेने करतात आणि पाच हजार रुपयांहून अधिक रकमेचे व्यवहार ऑनलाइन करण्याची त्यांची तयारी नसते. जानेवारी २०१८मध्ये देशातील डिजिटल व्यवहारांनी १.११ अब्ज असा विक्रमी उच्चांक गाठला असून, भारतीयांच्या दैनंदिन जीवनातही डिजिटायझेशनने स्थान मिळवले आहे. हा ट्रेंड वाढत असला, तरी डिजिटल ट्रॅडिशनलिस्ट इंटरनेटचा वापर केवळ माहिती मिळवण्यापुरता करतात. मूल्यांचा विचार करता, भारतात तबब्ल ९७ टक्के व्यवहार रोख रकमेने केले जातात, हे अधोरेखित होते.    

मोठ्या प्रमाणातील आर्थिक व्यवहार विचारात घेता, महानगरे किंवा अ दर्जाच्या शहरांत राहणाऱ्या व्यक्ती विमा योजना ऑनलाइन खरेदी करण्याची शक्यता अधिक असते, तर क व ड दर्जाच्या शहरांचे यातील योगदान तब्बल २३ टक्के आहे. त्यामुळे, आजच्या तंत्रज्ञान-प्रणित अर्थव्यवस्थेमध्ये ग्राहकांचे डिजिटल वर्तन समजून घेणे गरजेचे आहे.

इंटरनेटचा वाढलेला वापर ड्युरेबल्स, फॅशन, ट्रॅव्हल व मनोरंजन अशा श्रेणींतून दिसून येत असून, वित्तीय सेवा क्षेत्रही यामध्ये झपाट्याने सहभागी होत आहे. त्यामुळेच या सर्वेक्षणामध्ये असा निष्कर्ष काढण्यात आला आहे की, अधिकाधिक व्यक्ती ऑनलाइन पद्धतीने अधिकाधिक व्यवहार करू लागले आहेत, या बाबतीतील काही आव्हाने अजूनही कायम आहेत आणि डिजिटायझेशनचे स्वप्न पूर्णपणे साकरायचे असल्यास काही सुधारणाही कराव्या लागणार आहेत.
 
Feel free to share this article: https://www.bytesofindia.com/P/GZQUBP
Similar Posts
‘जग्‍वार लँड रोव्‍हर’तर्फे भारतातील पहिल्‍या बुटिक शोरूमचे उद्घाटन बेंगळुरू : जग्‍वार लँड रोव्‍हर इंडियातर्फे बेंगळुरूमधील कन्‍नीन्‍घम रोड येथे मार्कलँड यांच्या साथीने नवीन बुटिक शोरूमचे उद्घाटन करण्यात आले. जग्‍वार लँड रोव्‍हर इंडिया लिमिटेडचे (जेएलआरआयएल) अध्‍यक्ष व व्‍यवस्‍थापकीय संचालक रोहित सुरी आणि मार्कलँडचे संचालक नवीन फिलिप यांच्‍या हस्‍ते या नवीन केंद्राचे उद्घाटन करण्‍यात आले
बेंगळुरूमध्ये मोबाइल एक्स्पिरिअन्स सेंटर बेंगळुरू : सॅमसंग इलेक्ट्रॉनिक्सने बेंगळुरू या भारतातील टेक कॅपिटलमध्ये जगातील सर्वात मोठे मोबाइल एक्स्पिरिअन्स सेंटर सुरू केल्याची घोषणा केली आहे. कंपनीचे सर्वात मोठे मोबाइल एक्स्पिरिअन्स सेंटर जेथे असणार आहे त्या ब्रिगेड रोडवरील वौशिष्ट्यपूर्ण ऑपेरा हाउसचे नूतनीकरण करण्यात आले आहे व आर्किटेक्चरचा एक भव्य नमुना म्हणून जतन करण्यात आले आहे
पुण्यात होणार ‘जीआयआयएस’चा पहिला स्मार्ट कॅम्पस मुंबई : सिंगापूरमध्ये मुख्यालय असलेली ग्लोबल इंडियन इंटरनॅशनल स्कूल (जीआयआयएस) भारतातील पहिला स्मार्ट कॅम्पस पुणे येथे होणार आहे. सिंगापूरमध्ये २०१८मध्ये सादर केलेली आंतरराष्ट्रीय पुरस्कारप्राप्त स्मार्ट कॅम्पसची संकल्पना हडपसर आणि बालेवाडीत अंमलात आणली जाणार आहे. नव्या पिढीला २१व्या शतकातील कौशल्ये
‘एस टर्टल’ची ‘महिंद्रा लॉजिस्टिक्स’शी भागिदारी बेंगळुरू : आशियातील आघाडीची ऑम्नी चॅनेल प्लॅटफर्म कंपनी असलेल्या ‘एस टर्टल’ या कंपनीने महिंद्रा लॉजिस्टिक्स लिमिटेड या भारतातील सर्वात मोठ्या थर्ड पार्टी लॉजिस्टिक्स (थ्रीपीएल) सोल्यूशन पुरवठादार कंपनीशी भारतातील सर्वाधिक स्केलेबल ऑम्नी- चॅनेल फुलफिलमेंट सोल्यूशनसाठी भागिदारी केली आहे.

Is something wrong?
ठिकाण निवडा
किंवा

Select Feeds (Section / Topic / City / Area / Author etc.)
+
ही लिंक शेअर करा
व्यक्ती आणि वल्ली स्त्री-शक्ती कलाकारी दिनमणी
Select Language